महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मनेका गांधींविरोधात गुन्हा दाखल करा, केरळच्या वकीलाची पोलिसात तक्रार - Elephant death controversy

केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि इतर लोक हे जिल्हा आणि रहिवाशांविरोधात द्वेष पसरविणाऱ्या मोहिमेत सहभागी असल्याचे तक्रारीत वकिलाने म्हटले आहे.

Maneka Gandhi
मनेका गांधी

By

Published : Jun 5, 2020, 5:16 PM IST

मल्लप्पुरम -(केरळ)- भाजपच्या नेत्या मनेका गांधी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी एका वकिलाने मल्लप्पुरम जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मनेका गांधी या मल्लप्पुरम जिल्हा आणि जिल्ह्यातील रहिवाशांविरोधात द्वेष पसरवत असल्याचा वकिलाने आरोप केला आहे. सुभाष चंद्रन असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि इतर लोक हे जिल्हा आणि रहिवाशांविरोधात द्वेष पसरविणाऱ्या मोहिमेत सहभागी असल्याचे तक्रारीत वकिलाने म्हटले आहे.

जिल्ह्याविरोधातील मोहीम ही अवमानकारक आणि अपायकारक असल्याचे वकिलाने तक्रारीत म्हटले आहे.

पलक्कड जिल्ह्यातील मन्नरक्कड येथे हत्तीणीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या प्रकाराची गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमात चर्चा सुरू आहे. पण काही गट या घटनेला सामाजिक रंग देत असल्याचा वकिलाने आरोप केला आहे. मल्लप्पुरम हा मुस्लिमाची अधिक संख्या असलेला जिल्हा आहे.

हत्तीणीच्या मृत्यूची घटना ही मल्लप्पुरात घडली नसताही समाज माध्यमात तसा उल्लेख आहे, याकडे वकिलाने लक्ष वेधले. वकिलाने तक्रार अर्जात तारेख फतह या राजकीय विश्लेषकाचे नावही नमूद केले आहे.

अशी घडली होती नेमकी घटना

दरम्यान हत्तीणीने फळाशेजारी ठेवलेले फटाके खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला होता. वेदना सहन होत नसल्याने ती पाण्यात उभी होती. हा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. देशभरात या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details