नवी दिल्ली -सुप्रसिद्ध वकिल प्रशांत भूषण यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांबद्दल एक नवीन ट्विट केले असून ते चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेलेल्या न्यायमूर्ती बोबडे यांना मध्य प्रदेश सरकारने एक हेलिकॉप्टर उपलब्ध करुन दिले आणि त्याचा वापरही न्यायमूर्ती यांनी केली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या पाहुणचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशांत भूषण यांनी 21 ऑक्टोबरला ट्विट केले आहे.
'मुख्य न्यायाधीशांनी कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि तेथून त्यांचे मूळ गाव नागपूर येथे जाण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या हेलिकॉप्टरचा वापर केला. तेही मध्य प्रदेशातील बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा महत्त्वाचा खटला त्यांच्यासमोर प्रलंबित आहे. याच प्रकरणामुळे सध्या मध्य प्रदेशची सरकार सत्तेत आहे, असे टि्वट प्रशांत भूषण यांनी केले आहे. या ट्विटमध्ये प्रशांत भूषण यांनी विनय सक्सेना विरुद्ध मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष आणि इतर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही कॉपीही जोडली आहे.
या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एसए बोबडे आणि न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने 6 ऑक्टोबरला केली होती. या संदर्भातील अंतिम निर्णय 4 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे.