नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज(शुक्रवार) सकाळी फाशी देण्यात आली. तब्बल ७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आरोपींना फासावर लटकावण्यात आले. शिक्षा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फाशी देण्यास उशिर झाल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत.केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही शिक्षा देण्यास उशिर झाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
निर्भया प्रकरण : फाशीस उशिर झाल्यामुळे कायदा मंत्र्यांनी व्यक्त केली खंत...म्हणाले - ravi shankar prasad news
घृणास्पद कृत्य केल्याबद्दल सर्व दोषींन आज फाशी देण्यात आली. मात्र, दोषींना फाशी लवकर द्यायला पाहिजे होती, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
रविशंकर प्रसाद
'घृण्णास्पद कृत्य केल्याबद्दल सर्व दोषींना आज फाशी देण्यात आली. मात्र, दोषींना फाशी लवकर द्यायला पाहिजे होती, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
तर राज्यसभेच्या खासदार यांनीही उशिरा फाशी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. न्याय देण्यास उशीर म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे. या गुन्ह्यातील एक अल्पवयीन दोषी मुक्त झाला आहे. अल्पवयीन असल्यामुळे त्याला २०१५ साली सोडून देण्यात आले. त्याच्या वर्तनात बदल झाला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.