लखनऊ - बलिया येथील रेवती पोलीस ठाणे परिसरातील दुर्जनपूर गावात घडलेल्या घटनेबद्दल बोलताना बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका त्यांनी केली.
'उत्तर प्रदेशातील बलिया येथील घटना अत्यंत चिंताजनक आहे. येथे पोलिसांसमोर एका युवकाची हत्या झाली. तसेच, येथे अजूनही महिला आणि मुलींचा छळ होत आहे, हेही अनेकदा समोर आले आहे. येथील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः मृतावस्थेत पोहोचली आहे. सरकारने याकडे लक्ष दिले तर बरे होईल, असा बसपाचा सल्ला आहे,' असे मायावतींनी शुक्रवारी ट्विटरवर लिहिले आहे.
हेही वाचा -बिहार विधानसभा : एनडीएकडून 'रिपोर्ट कार्ड'चे अनावरण
उत्तर प्रदेशच्या बलिया येथे गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांसमोर आणि एसडीएमसमोर एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे प्रकरण दुर्जनपूरच्या बैरियाचे आहे. दोन दुकानांचा वाद मिटविण्यासाठी सीओ चंद्रकेश सिंह, बैरियाचे बीडीओ गजेंद्र प्रताप सिंह आणि एसडीएम सुरेश पाल येथे पोहोचले होते. हा वाद धीरेंद्र सिंह आणि जयप्रकाश उर्फ गामा पाल यांच्यात होता. गोळी झाडल्यानंतर लोक जयप्रकाश यांना घेऊन लोक सीएचसी (शहर रुग्णालय) येथे पोहोचले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
परिसरातील तणाव लक्षात घेता येथे संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. याप्रकरणी धीरेंद्र यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी उपस्थित एसडीएम, सीओ आणि पोलिसांना निलंबित केले आहे.
हेही वाचा -'लश्कर-ए-तैयबा'चा भूमिगत तळ भारतीय लष्कराने केला उद्ध्वस्त