नवी दिल्ली -हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यानंतर आज सपाच्या शिष्टमंडळाने पीडित मुलीच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी हाथरस गाठले. यावेळी सपाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात न आल्यावर पोलिसांनी सपा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तथापि, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरस पीडित कुटुंबाची भेट घेतली.
सरकारने पीडित कुटुंबाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवावी. अथवा मी त्यांना माझ्या घरी घेऊन जातो. ते येथे सुरक्षित नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केली.