महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरन्याधीशांचा आज कामकाजाचा शेवटचा दिवस, १७ नोव्हेंबरला होणार निवृत्त

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांचा आज (शुक्रवार) न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे. गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. मात्र, आजचा दिवसच त्यांचा शेवटचा असणार आहे.

रंजन गोगोई

By

Published : Nov 15, 2019, 11:42 AM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांचा आज(शुक्रवार) न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे. गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. मात्र, आजचा दिवसच शेवटचा असणार आहे. पुढील सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्यासह त्यांनी आजच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानुसार आज १० प्रकरणांवर निर्णय दिला जाणार आहे.

तीन ऑक्टोबर २०१८ ला रंजन गोगोई यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाली होती. तर येत्या १७ तारखेला ते निवृत्त होत आहेत. त्यांनी १३ महिने सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या खटल्यांचे निकाल देण्यात आले. अयोध्या प्रकरण, राफेल घोटाळा प्रकरण अशा संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या खटल्यांवर त्यांनी नुकताच निकाल दिला.

याबरोबर शबरीमला मंदिरातील महिल्यांच्या प्रवेशाबाबतच्या खटल्यावर त्यांनी गुरुवारी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यालय माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत येते हा एतिहासिक निर्णयही त्यांनी दिला. याबरोबरच सरकारी कार्यालयात ठराविक पदस्थ वगळून कोणत्याही नेत्याचे छायाचित्र लावण्यास बंदी असेल हा निर्णय त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदी आणि इंग्रजीसह ७ भांषांमध्ये देण्यात येईल हा निर्णयही त्यांच्याच कारकीर्दीत घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details