नवी दिल्ली - या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पार पडले. भारतात काही ठिकाणी कंकणाकृती, तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. तर, दुबईमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले. सकाळी आठच्या दरम्यान सुरू झालेले हे सूर्यग्रहण अकराच्या दरम्यान संपले.
मुंबईमध्ये ढगाळ वातावरणामुळे सूर्याचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे, खगोलशास्त्रप्रेमींची काहीशी निराशा होताना दिसून आली. दुसरीकडे दक्षिण भारतातील तिरूअनंतपूरम, चेन्नई या शहरांमध्ये स्पष्टपणे सूर्यग्रहण दिसून आले. देशातील ओडिशा, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्येही हे ग्रहण दिसून आले.
भारताबाहेर, श्रीलंका, मलेशिया, युनायटेड अरब इमिराती, सौदी अरेबिया, कतार, इंडोनेशिया, सिंगापूर, ओमान आणि गुआम या देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसून आले. ठिकठिकाणी हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
दुबईमध्ये दिसले कंकणाकृती सूर्यग्रहण..