मध्यप्रदेश -मंदसौरमधील एका शेतकऱयाने आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपल्या बैलाचे शेवटचे अंत्यसंस्कार केले आहेत.
अनोखी भूतदया ! कुटुंबातील सदस्याप्रमाणे केले बैलाचे शेवटचे अंत्यसंस्कार - animals,
मंदसौरमधील एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपल्या बैलाचे शेवटचे अंत्यसंस्कार केले आहेत.आजच्या काळात अशी माणुसकी खूप कमी लोकांमध्ये दिसून येते.
शेतकरी आणि बैलांचे नाते कधीही न तुटणारे नाते असते. गावातल्या छोट्या शेतकऱ्याचा खरा आधार आणि त्याची खरी संपत्ती बैल असतात. मंदसौरमधील उमरव सिंग यांनी बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार कुटुंबातील सदस्याप्रमाणे केले आहेत.
उमरव यांनी 18 वर्षापुर्वी बैल खरेदी केला होता. त्यांनी बैलाचे नाव रेण्डा असे ठेवले. बैल खरेदी केला तेव्हा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. मात्र बैल खरेदी केल्यापासूनच प्रगती होत गेली, असे उमरव यांनी सांगितले आहे. रेण्डाच्या जाण्याने उमरव व त्यांच्या कुटुंबीयाना दु:ख झाले आहे. उमराव यांनी रेंडाच्या तेराव्याला त्यांनी हिंदु प्रथेप्रमाणे गावकऱ्यांना जेवन दिले आहे. आजच्या काळात अशी माणुसकी खूप कमी लोकांमध्ये दिसून येते.