महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मागील 24 तासांत 1 हजार 409 रुग्ण; देशभरात रुग्णांचा आकडा 21 हजार 393 - india corona cout

मागील 28 दिवसांपासून 12 जिल्ह्यामधून एकही कोरोनाची नवी केस समोर आली नाही. तर 78 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला आहे, असे अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

आरोग्य सचिव लव अगरवा
आरोग्य सचिव लव अगरवा

By

Published : Apr 23, 2020, 5:52 PM IST

नवी दिल्ली- मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 409 रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात आत्तापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी याची माहिती दिली.

मागील 28 दिवसांपासून 12 जिल्ह्यामधून एकही कोरोनाची नवी केस समोर आली नाही. तर 78 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला आहे, असे अगवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यामुळे देशातील परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर 19 टक्के आहे.

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्यांना लॉकडाऊनमधून सुट देण्यात यावी. तसेच प्रीपेड मोबाईल रिचार्ज सेवाही सुरू ठेवण्यात यावी, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details