श्रीनगर - भारतीय लष्कराकडून 'लश्कर-ए-तैयबा'चा भूमिगत तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये झेलम नदीच्या किनारी कावेनी गावाजवळ हा तळ असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या पथकाने कारवाई केली.
'लश्कर-ए-तैयबा'चा भूमिगत तळ भारतीय लष्कराने केला उद्ध्वस्त - लश्कर-ए-तैयबाचा भूमिगत तळ उद्ध्वस्त
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये झेलम नदीच्या किनारी कावेनी गावाजवळ हा तळ असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या पथकाने कारवाई केली.
श्रीनगर
लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी येथील तळावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या तळाला लोह-शिशांनी बंदिस्त करण्यात आले होते. त्यामध्ये दोन खोल्या आणि एक शौचालय इतकी जागा आहे. या ठिकाणावरून पिस्तूल, मासिके आणि तीन ग्रेनेड्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -बिहार निवडणूकीसाठी मोदींचा प्रचाराचा धडाका! 12 सभा पैकी पहिली 23 तारखेला
Last Updated : Oct 16, 2020, 7:48 PM IST