शिमला - हिमाचल प्रदेशातील चंदिगढ- मनाली राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे. हा महामार्ग बियास नदीच्या बाजूने जातो. दरड कोसळल्यानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हिमाचल प्रदेश : चंदिगढ-मनाली महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक खोळंबली - चंदिगढ-मनाली वाहतूक खोळंबली
लहान वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, ट्रक, बस आणि अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील ढिगारा काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. महामार्गावरील ढिगारा काढण्यासाठी वेळ लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरड कोसळल्याने १०० मीटरपर्यंतच्या मार्गाचे नुकसान झाले आहे. मंडी जिल्ह्याच्या द्वाडा गावाजवळी ही घटना घडली.
लहान वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, ट्रक, बस आणि अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील ढिगारा काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रसत्यावरील ढिगारा हटविण्यासाठी जेसीबी मशीन लावण्यात आले आहेत.