महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये अजूनही लँडलाईन बंदच, लोकांसमोर अनेक अडचणी - जम्मू-काश्मीर

एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या आहेत. ' सरकार ३५ हजार लँडलाईन्स पुन्हा सुरू केल्या असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात येथील लँडलाईन सेवा सुरू नाही. सरकारने आमची समस्या लवकरात लवकर सोडवावी,' असे त्यांनी म्हटले आहे.

काश्मीर

By

Published : Sep 3, 2019, 3:39 PM IST

श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने आर्टिकल ३७० हटवल्यानंतर येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.

अजूनही अनेक ठिकाणी लँडलाईन टेलिफोन सेवा पूर्वपदावर आलेल्या नाहीत. मात्र, प्रशासनाने सर्व सेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात माध्यमांनी येथील लोकांनी संवाद साधल्यानंतर त्यांना येत असलेले वेगळे अनुभव समोर येत आहेत.

आदिल या स्थानिकाने याविषयी माहिती दिली आहे. ते सध्या काश्मीरमध्ये अनंतनाग येथे लहान मुलांच्या मदतीसाठी चाईल्डलाईन चालवत आहेत. त्यांना ५ ऑगस्टपासून एकही फोन कॉल होऊ शकला नसल्याचे सांगितले आहे. 'आम्हाला संपर्क साधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लँडलाईन्स सुरू नाहीत. मोबाईलद्वारेही संपर्कयंत्रणा पूर्ववत झालेली नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.

एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या आहेत. ' सरकार ३५ हजार लँडलाईन्स पुन्हा सुरू केल्या असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात येथील लँडलाईन सेवा सुरू नाही. सरकारने आमची समस्या लवकरात लवकर सोडवावी,' असे त्यांनी म्हटले आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आल्यानंतर येथील संपर्कयंत्रणा खंडित करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details