श्रीनगर -केंद्र सरकारने जम्मू काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यांच्या सैन्याकडून नियत्रंण रेषेवर गोळीबार सुरू आहे. राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. लान्स नाईक संदीप थापा (वय 35) असे जवानाचे नाव असून ते डेहराडूनमधील राजवाला गावातील रहिवासी आहेत.
नियंत्रण रेषेवरील चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण, प्रत्युत्तरात उडवली पाकिस्तानची चौकी - राजौरी सेक्टर
राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. लान्स नाईक संदीप थापा (वय 35) असे जवानाचे नाव असून ते डेहराडूनमधील राजवाला गावातील रहिवासी आहेत.
![नियंत्रण रेषेवरील चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण, प्रत्युत्तरात उडवली पाकिस्तानची चौकी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4162852-thumbnail-3x2-pak.jpg)
आज सकाळपासूनच राजौरी सेक्टरममध्ये भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले. यावर भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असून पाकिस्तानची एक चौकी उद्धवस्त केली आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानी सैन्याच्या 3 जवानांचा खात्मा केला होता. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.