महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लालूंच्या सुनेकडून विरोधी पक्षाचा प्रचार, नितीशकुमारांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे जनतेला आवाहन

लालू यादव यांची सून ऐश्वर्या राय यांनीही वडील चंद्रिका राय यांच्यासाठी जनतेला संबोधित केले. विद्यामान मुख्यमंत्री नितिशकुमारही या सभेत उपस्थित होते.

बिहार विधानसभा निवडणूक
बिहार विधानसभा निवडणूक

By

Published : Oct 21, 2020, 8:09 PM IST

पाटणा -बिहार विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून परस्परांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. चंद्रिका राय हे जेडीयूच्या तिकिटातून निवडणूक लढवत आहेत. लालू यादव यांची सून ऐश्वर्या राय यांनीही वडील चंद्रिका राय यांच्यासाठी जनतेला संबोधित केले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमारही या सभेत उपस्थित होते.

लालू यादव यांची सून ऐश्वर्या राय ...

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी जनतेला संबोधित केले. माझे वडील पारसा येथून विजयी व्हावेत. नितीशकुमारांना पुन्हा मुख्यमंत्री करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

चंद्रिका राय हे पारसा विधानसभा मतदारसंघातील जेडीयू उमेदवार आहेत. त्यांनी येथून आरजेडीच्या तिकिटावर शेवटची निवडणूक जिंकली होती. दरम्यान, त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचे लग्न लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांच्याशी झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. याच कारणास्तव, चंद्रिका राय नीतीशकुमार यांच्या पार्टीत दोन्ही कुटुंबांमधील संबंध बिघडल्यानंतर सामील झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details