बिहार निवडणूक : 'या' मतदारसंघातून आरजेडीला खातंही उघडता आलं नाही! - Bihar Assembly Election 2020
बिहार विधानसभा निवडणुकीत गोपाळगंजची हथुआ विधानसभेची जागा फार महत्वाची मानली जाते. या मतदारसंघात फुलवारीया हे राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांचे वडिलांचे गाव आहे. मात्र, आतापर्यंत हथुआ विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचा कोणताही उमेदवार प्रतिनिधित्व करु शकला नाही. 2005पासून या जागेवर जेडीयूचा ताबा आहे.
राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव
By
Published : Oct 18, 2020, 7:52 PM IST
गोपाळगंज - देशाच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करणारे लालू प्रसाद यादव हे गोपाळगंजमधील हथुआ विधानसभा मतदारसंघातील फुलवारीया गावातून आले आहेत. याचा त्यांच्या गावातील लोकांनाही अभिमान वाटतो की, त्यांच्या गावातील लालूप्रसाद राज्याचे प्रमुख झाले. मात्र लालूंच्या गावात आतापर्यंत त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला प्रतिनिधित्व करता आलेले नाही. 2005पासून या जागेवर जेडीयूचा ताबा आहे.
बिहार विधानसभा निवडणूकी 2020
लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या वडिलांचे गाव चमकवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. असे असूनही, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार येथून विधानसभेत गेला नाही. या जागेवर यापूर्वी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. परंतु सध्या या जागेवर जेडीयूचा ताबा आहे. लालूप्रसाद यादव हे बरेच दिवस बिहारचे मुख्यमंत्री होते आणि केंद्रात रेल्वेमंत्रीही होते. हथुआ परिसर म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या वडिलांचे गावच नाही तर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या वडिलांचे गाव सेलार कला हे सुध्दा हथुआ परिसरातच आहे.
लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री असताना फुलवारीया गावाला प्रखंड आणि झोनचा दर्जा दिला. इतकेच नव्हे तर, लालू प्रसाद यादव यांनी आपल्या फुलवारीत नोंदणी कार्यालय, बँक, हॉस्पिटल, हेलिपॅड, रेल्वे प्रकल्प अशा विकासकामांना हिरवा झेंडा दाखविला. तरीही या भागातील मतदार त्यांच्या उमेदवाराला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देत नाहीत. या विधानसभा जागेवर बहुतेक कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर मागील दोन विधानसभा निवडणुकीत या जागेवर जेडीयूने वर्चस्व राखले आहे.
पाच वेळा काँग्रेसने राखला गड
हा मतदारसंघ पूर्वी मीरगंज विधानसभा म्हणून ओळखला जात असे. 2010मध्ये तो हथुआ म्हणून अस्तित्वात आला. आकडेवारीवर नजर टाकल्यास स्वातंत्र्यानंतर 1952मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसच्या जनधन भगत यांनी जिंकली होती. यानंतर 1957, 1969, 1972, 1985मध्ये पाच वेळा कॉंग्रेसने या जागेवर ताबा मिळवला. 1990 मध्ये या जागेवर अपक्ष उमेदवार प्रभुदिल सिंह यांनी सीपीएमच्या विश्वनाथ सिंहचा पराभव केला होता.
यानंतर सीपीएमच्या विश्वनाथ सिंह यांनी 1995मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रभुदयाल सिंह यांचा पराभव केला आणि पुन्हा जागा जिंकली. 2000मध्ये समता पक्षाचे प्रभुदयाल सिंह यांनी अपक्ष अब्दुल समद यांचा पराभव केला आणि ते आमदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत हथुआ जेडीयूच्या ताब्यात आहे. 2005 पासून जेडीयूचे रामसेवक सिंह या विधानसभा मतदार संघातून सतत निवडणुका जिंकत आहेत. मात्र, यावेळी जेडीयूचे आमदार आणि समाज कल्याण मंत्री रामसेवक सिंह यांच्यात कडक संघर्ष होण्याची शक्यता आहे. राजदचे जिल्हाध्यक्ष राजेशसिंग कुशवाह हे त्यांचे काका प्रभुदयाल सिंग यांचा वारसा सांभाळण्याची तयारी करत आहेत.
गौरवशाली इतिहास
हथुआ विधानसभा मतदार संघाचा गौरवशाली इतिहास आहे. येथे प्रसिद्ध गोपाळ मंदिर आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे शिक्षण हथुआच्या राजेंद्र हायस्कूलमध्ये झाले. फुलवारीया येथे राहणारे लालूप्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. राजमंगल मिश्रा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनीही येथे प्रतिनिधित्व केले आहे.
हथुआ विधानसभा मतदारसंघातून विजयी व पराभूत झालेले उमेदवार-