नवी दिल्ली - यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित असून जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव हे सोशल मीडियावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत.
लालूंनी स्वत:च्या शैलीत नितीश सरकारला दिली 18 नावे... - lalu prasad yadav hits out at nitish kumar
चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव हे सोशल मीडियावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत.
लालू यादव यांनी टि्वट करून नितीश यांच्या सरकारवर टीका केली आहे. तसेच जनतेला हे सरकार हटवण्याचे आवाहन केले आहे. बिहारमध्ये गेल्या 15 वर्षापासून विश्वासघाती लोकांचे राज्य आहे. जनतेने हे राज्य हटवून गरिबांचे राज्य परत आणले पाहिजे, असे लालूनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षात होणार आहेत. बिहार विधानसभेत नितीन कुमार यांची कसोटी असेल. बिहारमध्ये 244 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात मागच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2015 मध्ये झाल्या होत्या.