नवी दिल्ली - भारतात आत्तापर्यंत 2 लाख 90 हजार 401 नागरिकांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे. देशभरातील 176 सरकारी आणि 7 खासगी लॅबमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या, अशी माहिती इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिली.
देशभरात 2 लाख 90 हजार नागरिकांची कोरोना चाचणी - आयसीएमआर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि कस्टर कंटेनमेंट करण्याबाबात चर्चा झाली - लव अगरवाल
काल (बुधवारी) 30 हजार 43 नागरिकांची चाचणी घेण्यात आली, यातील 26 हजार 331 चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये तर 3 हजार 712 चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये घेण्यात आल्याचे गंगाखेडकर यांनी सांगितले.
काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि कस्टर कंटेनमेंट करण्याबाबात चर्चा झाली, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.