महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोष्ट एका लग्नाची : नवरदेव कुख्यात गुंड, तर वधू पोलीस कॉन्स्टेबल; न्यायालयात झाली होती भेट - अनील दुजाना

एका पोलीस महिलेनं चक्क एका आरोपीशी विवाह केल्याची बातमी समोर येत आहे.

गोष्ट एका लग्नाची : नवरदेव कुख्यात गुंड तर वधू पोलीस कॉन्स्टेबल

By

Published : Aug 9, 2019, 6:02 PM IST

नवी दिल्ली -एका पोलीस महिलेनं चक्क एका आरोपीशी विवाह केल्याची बातमी समोर येत आहे. दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे. सध्या या अनोख्या विवाहाची सगळीकडेच चर्चा होत आहे. राहुल ठसराना असे या नवरदेवाचे नाव आहे.


नोएडामध्ये 2014 ला मनमोहन योगल हत्याकांड झाले होते. याप्रकरणी कुख्यात अनील दुजाना या टोळीचा सक्रीय सदस्य असलेला राहुल ठसराना तुरुंगात गेला होता. राहुल हा अनील दुजानाचा विश्वासहार्य शुटर होता.


याप्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयात हजर होण्यापूर्वी राहुलला न्यायालयीन परिसरातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. या कोठडीच्या संरक्षणाची जबाबादारी महिला कॉन्स्टेबलकडे होती. राहुल सुनावणीसाठी न्यायालयात यायचा तेव्हा त्यांची भेट होत होती. या दरम्यान त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. समाजाची पर्वा न करता त्यांनी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details