नवी दिल्ली - सोमवारी भारत-चीन विषयावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. 2010 ते 2013 या काळात 600 पेक्षा जास्त वेळा चीनने घुसखोरी केली. डॉ. मनमोहन सिंग त्या पक्षाचे आहेत. ज्यांनी 43 हजार कि.मी. भारतीय प्रदेश चीनला दिला. युपीए सरकारच्या काळात एक कमकुवत धोरण पाहायला मिळाले होते. त्यांनी लढा न देता जमीन चीनला दिली, असे ते म्हणाले.
लडाखवर भाष्य करणे हा केवळ शब्दांचा खेळ आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणताही भारतीय विश्वास ठेवणार नाही. कारण, काँग्रेसने वेळोवेळी सशस्त्र दलाचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींवर देशावासियांचा पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले.