लखनौ- देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले उत्तर प्रदेशातील कामगार, मजूर लोक सध्या लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरी परत पोहोचवणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. यासंदर्भात आराखडा बनवणे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आदित्यनाथ यांनी यांसदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. इतर राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांची यादी बनवा, असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तसेच त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करून राज्यात परत आणले जाईल, जेणेकरून कोरोनाबाबत सर्व खबरदारी पाळली जाईल, असेही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.