महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्ये प्रदेश: उज्जैनमध्ये बस पलटी, २ मजुरांचा मृत्यू तर ३६ जखमी - बस पलटी उज्जैन

सर्व मजूर इटावाह येथील रहिवाशी असून ते बसने अहमदाबादला जात होते. दरम्यान, बस वळण रस्त्यावर असताना बस चालकाला डुलकी लागली, त्यामुळे बसवर नियंत्रण नसल्याने ती वळणावर पलटी झाली.

बस पलटी
बस पलटी

By

Published : Aug 23, 2020, 4:40 PM IST

उज्जैन (म.प्र)- जिल्ह्यातील कायथा पोलीस ठाणा हद्दीत बस पलटी झाल्याने २ मजुरांचा मृत्यू झाला असून ३६ नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे ३.५० च्या सुमारास घडली.

सर्व मजूर इटावाह येथील रहिवाशी असून ते बसने अहमदाबादला जात होते. दरम्यान, बस वळण रस्त्यावर असताना बस चालकाला डुलकी लागली, त्यामुळे बसवर नियंत्रण नसल्याने ती वळणावर पलटी झाली. या घटनेत एका २४ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या मजुराचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत ३६ नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली.

हेही वाचा-'विद्यार्थ्यांची मन की बात ऐका'; जेईई व नीट परीक्षांबाबत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details