नवी दिल्ली - अरबी समुद्रातील क्यार हे चक्रीवादळ आता मुंबईच्या किनाऱ्यापासून ९८० किलोमीटर पुढे सरकले आहे. तर, ओमानपासून ते हजार किलोमीटर दूर आहे. हे चक्रीवादळ आता च्या, तसेच दक्षिण ओमान आणि येमेनच्या किनाऱ्यांच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादळाचा धोका कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
क्यार चक्रीवादळ 'एडनच्या आखाता'च्या दिशेने रवाना; भारतातील काही राज्यांना अतिवृष्टीचा इशारा - क्यार चक्रीवादळ अपडेट
भारताच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, क्यार चक्रीवादळ हे आता मुंबईच्या किनाऱ्यापासून ९८० किलोमीटर दूर सरकले आहे. मात्र, या चक्रीवादळाचा परिणाम होऊन भारताच्या काही राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#CycloneKyarr