बंगळुरु -कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांच्या एका व्हायरल क्लिपवरून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर टीका केली आहे. व्हायरल क्लिपमुळे भाजपचे कारस्थान उघड झाली आहेत, असे कुमारस्वामी म्हणाले.
'व्हायरल क्लिपमुळे भाजपचे कारस्थान उघड', कुमारस्वामींचा भाजपवर निशाणा - Kumaraswamy targets BJP
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांच्या एका व्हायरल क्लिपवरून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर टीका केली आहे.
काँग्रेस-जेडीएस सरकारच्या बंडखोर आमदारांना अमित शाह यांच्या देखरेखेखाली मुंबईत ठेवले आहे, असे बी. एस.येडियुरप्पा बोलत असल्याचं व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येत असल्याची माहिती आहे. दरम्यान संबधीत क्लिप पुरावा म्हणून न्यायालयात मांडणार असल्याचे कुमारस्वामी म्हणाले.
दरम्यान सिद्धरामैय्या यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन कर्नाटक सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कारस्थान करून 15 आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडले. सिद्धरामैय्या यांनी राष्ट्रपतींनाही यासंबधी निवेदन दिले आहे