बंगळुरू - केंद्रीय मंत्री डी.वी. सदानंद गौडा यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांचा रडण्याचा कौटुंबीक व्यवसाय आहे, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर कुमारस्वामी यांनी 'हो आमच्या कुटुंबाकडे रडण्याचे पेटंट आहे', असे म्हणत पलटवार केला आहे.
आमच्या कुटुंबाकडे रडण्याचे पेटंट, केंद्रीय मंत्र्यांच्या टिकेला कुमारस्वामींचे प्रत्युत्तर - आमच्या कुटुंबाकडे रडण्याचे पेटंट
केंद्रीय मंत्री डी.वी. सदानंद गौडा यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांचा रडण्याचा कौटुंबीक व्यवसाय आहे, अशी टीका केली होती.
आमच्या कुंटुंबाकडे रडण्याचे पेटंट आहे. आमचे आयुष्य भावनांनी भरलेले असून अश्रू आमच्या अंत: करणात असलेल्या वेदनांची अभिव्यक्ती करते, असे कुमास्वामी माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच विक्स किंवा ग्लिसरीन लावून कसे रडायचे हे मला माहित नाही. गरीब लोकांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी रडतो, असा टोला त्यांनी गौडांना लगावला.
कर्नाटकातील मंड्या येथील लोकांना ते संबोधीत करताना कुमारस्वामी भरसभेत रडले होते. त्यामुळे कार्यक्रमाला जमलेले कार्यकर्ते काही काळ स्तब्ध झाले होते. त्यावर गौडा यांनी कुमारस्वामी यांच्यावर टीका केली होती. ऑगस्ट आणि ऑक्टोबर जिल्ह्यामध्ये पूर आला होता. त्याहीपेक्षा धोकादायक हा अश्रूंचा पूर असतो, असे त्यांनी म्हटले होते.