बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मला कधीच मित्र समजले नाही, आशी भावना काँग्रेस नेता आणि राज्याचे पुर्व मुख्यमंत्री सिध्दारामय्या यांनी व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
कुमारस्वामींनी मला कधीच मित्र मानले नाही - सिध्दरामय्या - friend
'कुमारस्वामी यांनी मला कधीच त्यांचा शुभचिंतक आणि सहकारी समजले नाही. उलट त्यांनी मला शत्रूच मानले. त्यामुळेच सगळ्या समस्या सुरू झाल्या आहेत.
'कुमारस्वामी यांनी मला कधीच त्यांचा शुभचिंतक आणि सहकारी समजले नाही. उलट त्यांनी मला शत्रूच मानले. त्यामुळेच सगळ्या समस्या सुरू झाल्या आहेत. मात्र, मी त्यांचा दुश्मन कसा असु शकतो, असेही सिध्दरामय्या यांनी म्हटले आहे.
विश्वासदर्शक ठरावात भाजपच्या बाजूने १०५ मते पडली तर काँग्रेस पक्षाला ९९ मते मिळाली. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस-जेडी(एस)चे मागील 14 महिन्यात स्थापन झालेले सरकार कोसळले. काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार बहुमत चाचणीत फेल झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.