महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'राम-कृष्ण यांचे पुरावे विधानसभेत दाखल करू', कुमार विश्वास यांचा आपच्या नेत्यावर हल्लाबोल - आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार राजेंद्र पाल गौतम

आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार राजेंद्र पाल गौतम यांच्यावर आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी हल्लाबोल केला आहे.

कुमार विश्वास

By

Published : Nov 22, 2019, 11:32 PM IST

नवी दिल्ली -आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार राजेंद्र पाल गौतम यांच्यावर आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी हल्लाबोल केला आहे. रामदेव बाबा यांच्या एका टि्वटवरून राम आणि कृष्ण पूर्वज आहेत. तर मग त्यांना इतिहासात का शिकवले जात नाही, असे वादग्रस्त विधान राजेंद्र पाल गौतम यांनी केले होते.


आपचे नेते राम-कृष्णाच्या अस्तित्वाचा पुरावा मागत आहेत. तुमच्या साहेबांनी सैन्याकडून शौर्याचे पुरावे मागितले होते. मग लोकसभेत लोकांनी दिले होते. तुम्ही राम-कृष्ण यांचे पुरावे मागितले आहेत, थांबा आम्ही तुम्हाला पुरावे विधानसभेत देऊ, असे आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी ट्वीट करुन म्हटले आहे.


काय म्हणाले होते राजेंद्र पाल गौतम ?
राजेंद्र पाल गौतम यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, जर राम आणि कृष्ण पूर्वज होते. हे सिद्ध केले गेले आहे. तर त्यांना इतिहासात का शिकवले जात नाही. पूर्वजांचा इतिहास असतो. मात्र त्यांचा कोणताच इतिहास नाही.या पौराणिक कथा आहेत. पेरियारचा दृष्टीकोन सत्यता आणि तर्कशुद्धतेवर आधारित होता, असे गौतम यांनी रामदेव बाबा यांच्या टि्वटवर म्हटले होते.

राजेंद्र पाल यांनी संबधीत टि्वट डिलिट केले आहे.


दरम्यान राजेंद्र पाल यांनी संबधीत टि्वट डिलिट केले आहे. त्यानंतर त्यांनी मी असे कोणतेच टि्वट केले नसून कोणीतरी माझे खाते हॅक केले होते, असा दावा केला .

ABOUT THE AUTHOR

...view details