नवी दिल्ली - जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आणि पाकिस्तानात दहशतवाद्यांसोबत काम करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या मुनीब सोफीला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मुनीब सोफीला कुलगाम पोलिसांच्या पथकाने दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून अटक केली. मुनीब हा जम्मू काश्मीरमधील बिजबेहारा येथील रहिवासी आहे.
पाकिस्तान दहशतवाद्यांसोबत काम करणाऱ्या मुनीब सोफीला दिल्ली विमानतळावरून अटक
पाकिस्तानात दहशतवाद्यांसोबत काम करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या मुनीब सोफीला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मुनीब हा जम्मू काश्मीरमधील बिजबेहारा येथील रहिवासी आहे.
दहशतवादी
मुनीब सोफीने पाकिस्तानी दहशतवादी वलीद भाईसाठी काम केल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या चकमकीत वलीदला कुलगाम पोलिसांनी ठार केले होते. मुनीब बराच काळ फरार होता. पोलिस त्याचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. तेव्हा तो कतारला पळून गेल्याचे पोलिसांना कळाले होते. आज कुलगाम पोलिसांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याला अटक केली आहे.