नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी तीस हजारी न्यायालयाने आज निकाल दिला आहे. बहिष्कृत भाजप आमदार कुलदिप सेंगरसह ७ जण या प्रकरणी दोषी असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तर ४ जणांची न्यायालयाने सुटका केली आहे. बलात्कार प्रकरणी न्यायालयाने आधीच कुलदिप सेंगरला शिक्षा सुनावली आहे.
पीडितेच्या वडिलांचा तुरुंगात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस सेंगरला आता दोषी धरण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणी सेंगरला आधीही न्यायालयाने दोषी धरून शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात एकूण ११ आरोपी होते. त्यातील ७ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी १२ मार्चला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.