महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विमान दुर्घटना: मृतांमधील प्रवासी होता कोरोनाबाधित; मदतकार्यातील सर्वजण क्वारंटाईन - Kerala Health minister KK Shailaja on plane crash

कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईमधून प्रवाशांना घेणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात मदतकार्यासाठी पीपीई कीटसह इतर सुविधा नसताना अनेकांनी सहभाग घेतला.

विमान अपघाताचे भयंकर दृश्य
विमान अपघाताचे भयंकर दृश्य

By

Published : Aug 8, 2020, 12:34 PM IST

Updated : Aug 8, 2020, 12:40 PM IST

तिरुवनंतपुरम- केरळमधील कोझिकोड विमानतळावरील विमान दुर्घटनेतील एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली होती, हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मदतकार्यातील सर्वांनी विलगीकरणात दाखल व्हावे, असे केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी निर्देश दिले आहेत.

कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईमधून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात मदतकार्यासाठी पीपीई कीटसह इतर सुविधा नसताना अनेकांनी सहभाग घेतला. वेळीच मदतकार्य केल्याने आरोग्यमंत्री शैलजा यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी अपघातस्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, अपघातामुळे कोझिकोड विमानतळ बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त विमानात 190 प्रवासी होते. या अपघातात मुख्य पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 123 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Last Updated : Aug 8, 2020, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details