नवी दिल्ली -केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईमधील प्रवाशांना घेऊन येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातातील 56 जखमी प्रवाशांना रुग्णायातून सोडण्यात आले आहे, अशी एअर इंडिया एक्सप्रेसने दिली.
एअर इंडियाचे बोइंग 737 विमान दुबईहून 190 जणांसह कोझिकोडला पोहोचले होते. विमानतळावर लँडिंगदरम्यान ते 35 फूट खोल दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. यात काहींचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले. जखमींना कोझिकोड येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.