कोटा -बिहार सरकारच्या आक्षेपानंतर कोटा जिल्हा प्रशासनाने शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवाना देणे बंद केले आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन कालावधी जसा वाढत गेला तशी परिस्थिती अधिक त्रासदायक होत आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने कोटा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी २५० बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट्यात शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा परवाना नाकारला, विद्यार्थी आपल्या राज्यात रवाना यापैकी उत्तर प्रदेशमधील सुमारे ८००० विद्यार्थी आपल्या राज्यात रवाना होतील. त्यापैकी आगरा येथून १५० तर, झांशी येथून १०० बसेसची रवानगी होणार आहे. या बसगाड्यांमध्ये सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी यांचाही समावेश राहणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध भागातून या बस रवाना होणार आहे.
कोचिंग संस्थांच्या संचालकांनी उत्तर प्रदेश येथील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार या बस रवाना होतील.
ट्विटरवर SENDBACKHOME हॅशटॅग -
लॉकडाऊनमुळे कोटा कोचिंग संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. कोटा जिल्हा प्रशासनाने परवानगी देणे देखील बंद केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ट्विटरवर SENDBACKHOME हॅशटॅग सुरू केले होते. या हॅशटॅगवर सुमारे ८० हजार ट्विट करण्यात आले आहेत.
कोटा येथे विविध राज्यातील विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनियरिंग प्रवेश परीक्षांच्या शिकवणीसाठी येत असतात. डिसेंबर महिन्यात त्यांचा कोर्स पूर्ण होत असतो. यामध्ये आता २० टक्के विद्यार्थी असे आहेत, ज्यांचे परीक्षा केंद्र हे कोटा आहे. तर, काही जण पुढच्या वर्षापर्यंत अभ्यास सुरू ठेवणार आहेत. यामधील जवळपास १० हजार विद्यार्थी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन आता आपल्या राज्यात परत जाणार आहेत. आता कोटो येथे फक्त ३०,००० विद्यार्थी आहेत.
कोचिंग संस्थेनुसार, उत्तर प्रदेशचे जवळपास ८००० विद्यार्थी कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. तसेच बिहारचे ७०००, मध्यप्रदेशचे ३५००, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रातील २००० विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.