पणजी- कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी साजरी होत असताना याच काळात कोकण आणि गोव्यातील पारंपरिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावात लोटांगण यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत शेकडो स्री-पुरुष भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला होता.
माहिती देताना श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचे प्रमुख मानकरी पांडुरंग दत्तराम परब जत्रोत्सव लोटांगणात संपूर्ण मंदिर परिसराला लोळण घेत प्रदक्षिणा घातली जाते. यासाठी भाविक दिवसभर पाण्याचा थेंबही प्राशन करत नाहीत. रात्री उशिरा मंदिरातील धार्मिक कार्यक्रमानंतर लोटांगणाने उपवास सोडला जातो. तर देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक गर्दी करत असतात. ज्यामध्ये माहेरवाशीणी मोठ्या संख्येने येत देवीची खणा-नारळाने ओटी भरतात.
मातोंड गावातील लोटांगण हा नवसप्रकार खूप आगळावेगळा आहे. ते पाहण्यासाठी परिसरातील अनेक गावातील लोक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. दारुकामाची आतीषबाजी आणि मंदिरावरील नेत्रदीपक विद्युत रोषणाई सर्वांनाच भूरळ पाडते. लोटांगणाविषयी माहिती देताना श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचे प्रमुख मानकरी पांडुरंग दत्तराम परब म्हणाले की, लोटांगण हा देवीचा पारंपरिक प्रकारचा उपवास आहे. ज्यामध्ये भाविक सकाळपासून निर्जल उपवास करतात. मंदिराच्या पहिल्या पायरीवरुन लोटांगण घालत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. यामध्ये पुरुष भाविक लोळण घेऊन तर महिला उभ्याने डोळेबंद करत प्रदक्षिणा पूर्ण करतात. याशिवाय मातोंडमधील घोडमूख देवस्थानची जत्रा 'कोंब्याची जत्रा' म्हणून प्रसिद्ध आहे.
हेही वाचा-सदोष उपचारांसाठी आता मिळणार भरपाई..