महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिमुकला झाला 'बुलेटराजा', वडिलांनी घरीच तयार केली 'बोन्साय बुलेट'

पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न असलेल्या मुलासाठी केरळमधील एका हौशी वडिलांनी बुलेटची लहान प्रतीकृती बनवली आहे. ही लहानगी गाडी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

miniature working bullet

By

Published : Sep 13, 2019, 6:58 PM IST

Updated : Sep 13, 2019, 7:08 PM IST

कोल्लम- पथनापुरम येथील एका हौशी वडिलांनी शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलाला बुलेट गाडी भेट दिली आहे. व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असलेल्या अनुप सदानंदन यांना लहानपणापासून कलात्मक वस्तू बनवण्याचा छंद आहे. त्यांनी मुलगा अद्वैतसाठी रॉयल इनफिल्ड गाडीचे लहान मॉडेल बनवले आहे.

मुलासाठी या वडिलांनी घरीच तयार केली 'बुलेट'!

पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न असलेला अद्वैतही सध्या वडिलांनी दिलेली बुलेट फिरवत असतो. अनुप यांनी बनवलेली लहानगी बुलेट १२२ सेंटी मीटर लांब आणि ६० सेंटी मीटर रुंद आहे. फायबर आणि मेटलचा वापर केलेल्या या गाडीला १२ व्होल्टची क्षमता असलेली बॅटरी व मोटारही लावलेली आहे. याच्या सहाय्यानेच गाडी फिरते.

हेही वाचा : आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याच्या विधानावरून पियूष गोयल 'ट्रोल'

एकदा चार्ज केल्यानंतर ही बुलेट सलग २ ते ३ तास फिरवता येते. अनुप यांनी अनेक वस्तूंच्या लहान प्रतिकृती बनवल्या आहेत. त्यांच्या या छंदाला पत्नी हिमा आणि त्यांचे कुटुंबीयही पाठिंबा देतात.

Last Updated : Sep 13, 2019, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details