कोलकाता - जग दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. तसेच त्यात बदलही घडत आहेत. वातावरणातही बदल होत आहेत. सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्यात वाढ हे जागतिक तापमान वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. हा प्लास्टिक कचरा समाजासाठी जणू शाप आहे.
फक्त म्हणण्यापुरते केंद्र सरकार आणि आणि राज्य सरकारांनी प्लास्टिक बंदीची घोषणा केली. मात्र, खरी परिस्थिती वेगळीच आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात प्लास्टिक कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मात्र, जवळील बांगूर एवेन्यू हे ठिकाण स्वच्छतेचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे.
हेही वाचा - नो टू सिंगल युज प्लास्टिक: हैदराबादच्या युवकानं बनवलं विना प्लास्टिक क्रेडिट कार्ड
बांगूर एवेन्यू भागात राहणारे नागरिक प्लास्टिकचा वापर करत नाहीत. त्याऐवजी पेपर पासून बनवलेली पाकिटे आणि कापडी पिशव्यांचा वापर करतात. येथील दुकानदारही प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता सरकारी नियमांचे पालन करतात.
जर तुम्ही कोलकात्याच्या बाजारामध्ये जाल तर तुम्हाला प्लास्टिक पिशव्या सररास पहायला मिळतील. मात्र, बांगूर एवेन्यू येथील बाजारामध्ये एकही प्लास्टिकची पिशवी पहायला मिळणार नाही. येथील मोठ्या दुकानदारांसह छोटे दुकानदारही कागदी पॅकेटचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी बांगूर एवेन्यू भागात पावसाचे पाणी साठून राहण्याची समस्या होती. मात्र, या भागात आता पाणी तुंबण्याची समस्या राहिली नाही.