कोलकाता -आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा आश्चर्यकारकरित्या जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. कोलकात्याच्या गीतांजली मेट्रो स्टेशनवर सकाळी १०.३०च्या सुमारास ही घटना घडली होती. हा संपूर्ण थरार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.
VIDEO : महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद, आश्चर्यकारकरित्या वाचला जीव.. - Suicide attempt in kolkata
या प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि मेट्रोवरील कर्मचारी लगबगीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले. या अपघातामधून ती आश्चर्यकारकरित्या बचावली असून, तिला किरकोळ जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रोची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे. मेट्रो येताच ती अचानकपणे गाडीसमोर उडी मारते, असे या व्हिडिओमध्ये दिसून येते. या प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि मेट्रोवरील कर्मचारी लगबगीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले. या अपघातामधून ती आश्चर्यकारकरित्या बचावली असून, तिला किरकोळ जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा :कोरोनाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ५० अब्ज डॉलरची मदत