महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळ सोने तस्करी प्रकरण : स्वप्ना सुरेशच्या जामीन अर्जावरील निकाल राखीव - केरळ सिमा शुल्क विभाग

केरळमधील सोने तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्ना सुरेशच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोची न्यायालयाने 12 ऑगस्टसाठी राखून ठेवली आहे.

केरळ सोने तस्करी प्रकरण
केरळ सोने तस्करी प्रकरण

By

Published : Aug 8, 2020, 8:54 AM IST

कोची (तिरुवनंतपुरम) - केरळमधील सोने तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्ना सुरेशच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोची न्यायालयाने 12 ऑगस्टसाठी राखून ठेवली आहे. अतिरिक्त निर्दोष न्यायदंडाधिकारी (आर्थिक गुन्हे) स्वप्न सुरेशच्या जामीन याचिकेवर सुनावणी केली होती. त्या याचिकेत स्वप्नाने आपण निर्दोष असल्याचे म्हटलं आहे.

शुक्रवारी युक्तिवाद करताना सिमा शुल्क विभागाने स्वप्नाविरोधात ठाम पुरावे असल्याचे म्हटलं आहे. तस्करी प्रकरणातील दुसरा आरोपी संदीप नायरच्या पत्नीने स्पप्नाविरोधात साक्ष दिली आहे.

बँकमध्ये सोनं असल्याची खात्री असल्यामुळे स्वप्नाने सामान परत पाठविण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या उच्च संबंधाचा गैरफायदा घेत केरळमधून फरार झाली. कोरोना कालावधीत कठोर तपासणी असूनही आपण अडचणीविना चेकपॉईंटमधून जाऊ अशी तीला खात्री होती, असे सिमा शुल्क विभागाने म्हटलं. तसेच अशा प्रभावी लोकांना जामिनावर सोडण्यात आल्यास या खटल्याची स्थिती काय असेल, असा प्रश्न सिमा शुल्क विभागाने न्यायालयात उपस्थित केला.

यापूर्वी 6 ऑगस्टला सुनवाणी दरम्यान स्वप्ना सुरेशच्या जामिनाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विरोध केला होता. तिचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे कार्यालय आणि दुबईच्या दुतावासात जवळचे संबंध आहेत. त्या संबंधाचा आरोपीने खूप गैरफायदा घेतल्याचा एनआयएने दावा केला होता. दुबई दुतावासातून नोकरी सोडल्यानंतर तिला दर महिन्याला 1 हजार डॉलरचे वेतन देण्यात येते. यावरून तिचे दुबईमधील दुतावासात जवळचे संबंध असल्याचे दिसून येते, असे तपास संस्थेने म्हटलं होतं.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान स्वप्ना सुरेशच्या दोन बँक लॉकरकडून सुमारे 1 कोटी रुपयांची रोकड आणि 982.5 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच न्यायालयाने आरोपी स्वप्ना सुरेश व संदीप नाय्यर यांना 21 ऑगस्टपर्यंत न्यायिक कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एर्नाकुलमच्या कक्कानाड येथील जिल्हा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

दुबईवरून विमानाद्वारे केरळात आणण्यात आलेल्या राजनैतिक सामानात 30 किलो सोने आढळून आले होते. या सोन्याची तस्करी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली करण्यात येत होती. कारण राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानाची तपासणी केली जात नाही. या तस्करीप्रकरणी युएई कौन्सलेट विभागाचा माजी कर्मचारी पी. एस सारीथ याला सीमा शुल्क विभागाने 5 जुलैला अटक केली होती. याप्रकरणी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. आरोपी स्वप्ना आणि संदिप नायर यांना बंगळुरुतून अटक करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details