महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात... - सुपरफास्ट राजधानी एक्सप्रेस न्यूज

रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. तर सरकारकडून कोरोना लस मोठ्या प्रमाणात आज खरेदी होणार आहे.

दिवसभरात काय होणार
दिवसभरात काय होणार

By

Published : Jan 14, 2021, 5:54 AM IST

नवी दिल्ली-नव्या वर्षातील पहिला सण हा मकरसंक्रात देशभरात साजरा होत आहे. त्याचवेळी देशात कोरोना लसीचे वितरण होत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. दिवसभरात काय महत्त्वाच्या घटना आहेत, त्याचा हा घेतलेला वेध आहे.

१.नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस आजपासून होणार सुरू

अमरावती- रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोनाकाळात बंद झालेली काचीगुडा एक्स्प्रेस आजपासून सुरू होत आहे. रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस सुरु केली होती. काचीगुडा- नरखेड (गाडी क्रमांक ०७६४१) ही गाडी १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०७६४२) ही गाडी १५ जानेवारी रोजी नरखेड येथून धावणार आहे. या गाडीत आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

भारतीय रेल्वे

२. देशभरात साजरी होणार मकर संक्रात

नवी दिल्ली-'दानाचे पर्व' मानली जाणीर मकर संक्रांती उत्तर प्रदेशात आज साजरी होणार आहे. बंगालमधील या उत्सवात गंगासागरवर मोठा मेळावा आयोजित केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागरमध्ये दरवर्षी मोठी गर्दी होते. महाराष्ट्रा तिळगूळ वाटून तर गुजरातमध्ये पंतग उडवून मकर संक्रात उत्साहात साजरी केली जाणार आहे.

पंतगासाठी मुलांची लगबग

३. मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट ट्रेन दररोज धावणार

मुंबई-मध्य रेल्वेने मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन आठवड्यात चार दिवस सुरू राहणार आहे. मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे. ही माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन दिली आहे.

रेल्वे

४. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या दौऱ्यावर

बीजिंग -कोरोनाची साथ पसरल्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चीनच्या दौऱ्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे पथक जाणार आहे. हे पथक कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करणा आहे. वादग्रस्त ठरलेल्या वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी’ला जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य भेट देणार आहेत की नाहीत, ही माहिती चीनकडून देण्यात आलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष

५. सरकारकडून लशीची मोठ्या प्रमाणा खरेदी होणार

नवी दिल्ली- कोरोनाच्या लढ्यात निर्णायक टप्पा असलेल्या लसीकरणाच्या मोहिेमेसाठी सरकारने पूर्ण तयारी सुरू केली आहे. १४ जानेवारीपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून १.१ कोटी आणि भारत बायोटेककडून ५५ लाख डोस सरकार खरेदी करणार आहे. त्यानंतर दोनच दिवसात १६ जानेवारीपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कोरोनाच्या लसीचे कंटेनर हे पुण्यातील सीरम आणि हैदराबादमधील भारत बायोटेकमधून विविध शहरांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

प्रतिकात्मक-कोरोना लस

६. सॅमसंग गॅलक्सी एस २१ सिरीजच्या खरेदीवर भन्नाट ऑफर

मुंबई - सॅमसंग गॅलेक्सी एस२१ सीरिजच्या लाँजिंगपूर्वी कंपनीने आजपासून भन्नाट ऑफर दिली आहे. या स्मार्टफोनसाठी भारतीय ग्राहकांना बुकिंग करण्यात येणार आहे. २ हजार रुपयांची रक्कम भरून हे बुकिंग करता येणार आहे. या ग्राहकांना ३,८४९ रूपये किंमतीचे मोबाईल कव्हर मोफत दिले जाणार आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून स्मार्टफोनच्या बुकिंगला सुरुवात केली जाणार आहे.

सॅमसंग

७. केंद्र सरकार सर्व डोस आज खरेदी करणार

नवी दिल्ली - देशातील लसीकरणाच्या तयारींबाबत मंगळवारी केंद्र सरकारने मासिक अहवाल सादर केला. यात अहवालाच्या माहितीनुसार सिरम इन्स्टीट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनशिवाय अजून ४ व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. १४ जानेवारीपर्यंत लसीकरणाच्या मोहिमेंतर्गत सर्व डोस खरेदी केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, या सर्व लस भारतात तयार होत आहेत. त्यांना आपत्कालीन स्थितीत वापरासाठी परवानगी मिळू शकते.

कोरोना लस

८. भारतीय सोशल मीडिया असलेले हाईक स्टीकर अॅप आजपासून बंद

मुंबई- सोशल मीडियाच्या वापरासाठी तरुणाईमध्ये क्रेझ आहे. हे पाहून सुरू केलेली हाईक स्टीकर अॅप आजपासून बंद करण्यात येणार आहे. हाईकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केविन भारती मित्तल यांनी ट्विट करून अॅप बंद होणार असल्याचे म्हटले आहे. या अ‍ॅपचे भारतात १० दशलक्षहून अधिक वापरकर्ते आहेत. हायकचे दोन अॅप वाईब आणि रश कार्यरत राहणार असल्याचे मित्तल यांनी ट्विटमध्ये आहे.

सोशल मीडिया

९. पनवेलमधील २७ निवासी भूखंडांचा आज ई-लिलाव

मुंबई - नवीन पनवेल आणि घणसोलीमध्ये बंगला किंवा रो हाऊस बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सिडकोने एक मोठी खुशखबर दिली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर सिडकोने घणसोली आणि नवी पनवेलमधील २७ निवासी बंगले तसेच रो हाऊस भूखंड विक्रीसाठी जाहिरात काढली आहे. त्यानुसार १४ जानेवारीला या भूखंडांचा ई-लिलाव होणार आहे.

म्हाडा

१०- महिलांसाठी सैन्यदलातील नोकरी भरतीसाठी शेवटची तारीख

पुणे- सैन्यदलाच्या वतीने १२ ते १४ जानेवारी दरम्यान महिलांसाठी नोकरी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग याठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील युवा महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने नोकरी भरती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील इच्छुक महिला उमेदवारांनी wwww.joinindianarmy.nic.in.संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झाले आहे, अशा महिला उमेदवारांना भरतीसाठी उपस्थित राहता येणार आहे.

महिला सैन्य अधिकारी

ABOUT THE AUTHOR

...view details