महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जाणून घ्या, काय होणार आज दिवसभरात - spice jet sale

नासाकडून आजपर्यंतचे जगातील सर्वांत शक्तिशाली रॉकेट स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) नासाकडून (NASA) प्रक्षेपित केली जाणार आहे. तर राज्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीनिमित्त होणारा यंदाचा २८ वा गदिमा काव्य महोत्सव होणार आहे.

दिवसभरातील घडामोडी
दिवसभरातील घडामोडी

By

Published : Jan 17, 2021, 6:46 AM IST

नवी दिल्ली -नासाच्या महाकार्य रॉकेटची झेप असो की राज्यातील कुस्तीस्पर्धेची झेप याबाबत आज महत्त्वाच्या घडामोडी घडमार आहेत. अशा महत्त्वाच्या घडामोडींचा घेतलेला वेध वाचा.

१. जगातल्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटची नासा करणार चाचणी

नासाकडून आजपर्यंतचे जगातील सर्वांत शक्तिशाली रॉकेट स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) नासाकडून (NASA) प्रक्षेपित केली जाणार आहे. या यंत्रणेच्या चाचणीचा हा शेवटचा टप्पा आहे. या शक्तिशाली रॉकेटचा उपयोग गैरव्यावसायिक मानवी अवकाश मोहिमांसाठी केला जाणार आहे. ही मोहीम तीन टप्प्यांची आहे.

नासा

२. गदिमा महोत्सवाचे माडगूळेमध्ये आयोजन

साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीनिमित्त होणारा यंदाचा २८ वा गदिमा काव्य महोत्सव १७ जानेवारीला होणार आहे. हा महोत्सव माडगूळकर यांच्या गावी म्हणजेच आटपाडी तालुक्यातील माडगूळे गावात होणार आहे.

हा महोत्सव नारायण सुर्वे कला अकदामी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आटपाडी शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसली शाखा व माडगुळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यामने घेतला जाणार आहे. या महोत्सावत विविध पुरस्कारही साहित्यिक, कवी, लोककलावंत यांना देण्यात येणार आहेत.

३. शेतकरी आंदोलनातील नेत्यास अभिनेत्यांची एनआयएकडे आज होणार चौकशी

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे बलदेव सिंह सिरसा आणि अभिनेते दीप सिद्धू यांना एनआयएने नोटीस दिली आहे. या नोटीसनुसार त्यांना आज चौकशीसाठी एनआयएच्या नवी दिल्लीतील लोधी रोड इथल्या मुख्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

राष्ट्रीय तपास संस्था

४. पोलिओ लसीकरण पुढे ढकलले

पल्स पोलिओ लसीकरण दरवर्षी देशभरात १७ जानेवारीला घेण्यात येते. ही मोहिम कोरोाच्या लसीकरणामुळे आज पुढे ढकलली आहे.

पल्स पोलिओ मोहिम

५. स्पाईसजेटच्या सेलची शेवटची तारीख

कोरोना काळात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपनी स्पाईसजेटने बुक बेफिकीर हा सेल आणला होता. या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासात तिकीट ८९९ केवळ रुपयांपासून सुरू होते. या सेलची आज शेवटची मुदत आहे.

स्पाईसजेट

६. सीमाभागात हुतात्मा दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी प्राणांचे बलिदान दिले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा १९५६ पासून तीव्र झाला. त्यानंतर या लढ्याचे स्मरण ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी बेळगावात १७ जानेवारीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. त्यामुळे सीमाभागात आज हुतात्मा दिन पाळला जातो.

७. फिल्पकार्ट स्मार्टपॅक प्रोग्रामची आजपासून सुरुवात

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट एका सेलमध्ये मोफत स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. ही ऑफर १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्रामअंतर्गत मोफत फोन खरेदी करण्याची ग्राहकांना संधी मिळणार आहे. ग्राहकाला स्मार्टफोन खरेदी करताना १२ महिने किंवा १८ महिन्यांचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. मुदत संपल्यानंतर ग्राहकाला स्मार्टफोनचा १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

फ्लिपकार्ट

८. कुस्ती स्पर्धेची तारीख निश्चित होणार

राज्यातील कुस्ती स्पर्धा मार्चमध्ये घेण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे नोव्हेंबर महिन्यात स्पर्धा होऊ शकली नाही. आज कुस्तीगीर परिषदेची बैठक होणार आहे. याच बैठकीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वेळापत्रकासह यजमानपद भूषवणाऱ्या जिल्ह्याच्या नावाची घोषणा होणार आहे.

कुस्ती मैदान

९. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संचांरबदी हटणार..

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सिद्धेश्वर मंदिरात १२ जानेवारी मध्यरात्री ते १७ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत संचाबंदी लागू केली होती. आज मध्यरात्री ही संचाबबंदी संपत आहे. महिनाभर चालणाराी यात्रा प्रशासनाने चार दिवस आटोपली आहे.

सिद्धेश्वर यात्रा

१०. गीतकार जावेद अख्तर यांचा वाढदिवस

बॉलिवूड लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलीवूडमधील लिहिलेली अनेक गीत अजरामर ठरलेली आहेत. आज त्यांचा जन्मदिवस. जावेद अख्तर यांनी दिवार, जंजीर आणि शोलेसारख्या सिनेमांचे स्क्रीनप्ले लिहिले आहेत. त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री तर २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अख्तर यांना याआधीच पाच नॅशनल अॅवॉर्ड मिळाले आहेत. याशिवाय त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.

जावेद अख्तर

त्यांना रिचर्ड डॉकिन्स २०२० पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पकवणारे ते पहिलेच भारतीय आहेत. अख्तर यांना मानवतावादी मूल्य, मानवी प्रगतीसाठी आणि त्यांच्या परखड विचारसरणीसाठी हा पुरस्कार मिळाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details