हैदराबाद : पाकिस्तानी सैनिकांनी वर्ष १९९९ मध्ये कारगिलमध्ये नियंत्रण रेष पार करून भारताच्या भूभागांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरूवातीपासूनच पाकिस्ताना कारगिलवर त्याला ताबा मिळवायचा आहे, हे मान्य करण्यास तयार नव्हता. दूरध्वनीवरील एक संभाषण आणि काही दस्तऐवजांनी पाकिस्तानचा हा खोटारडेपणा जगासमोर आणला. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याची योजना पाकिस्तानने लाहोर शिखर परिषदेच्या अगोदर नोव्हेंबर १९९८ मध्येच तयार केली होती.
ऑगस्ट-सप्टेंबर १९९८ मध्ये सियाचिन मुद्यावरील वादामुळे भारत पाकिस्तान संवाद संपला होता. त्यानंतर ऑक्टोबर १९९८ मध्ये तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी मुशर्रफ यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
पाकिस्तानने ताबा मिळवलेले क्षेत्र आणि चौक्या..
कारगिल युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी उंचावरील शिखरांवर ताबा मिळवला होता. पाकिस्तानी सैनिकांनी जोजिला आणि लेह या दरम्यान मुश्कोह, द्रास, कारगिल, बटालिक आणि तुर्तुक उपविभागांमध्ये घुसखोरी केली. सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि भारतीय भागात ४ ते १० किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. पाकिस्तानी सैनिकांनी १३० चौक्यांवर ताबा मिळवला होता.
घुसखोरीचा कट..
पाकिस्तानचा घुसखोरीचा कट भारतीय सैन्यासाठी आश्चर्यकारक होता. या योजनेंतर्गत पाकिस्तानने सर्वप्रथम द्रास आणि मुश्कोह खोरे तसेच बटालिक-यलदोर-चोरबतला क्षेत्र आणि तुर्तुकमध्ये घुसखोरी केली. द्रास आणि मुश्कोह खोरे एलओसीच्या सर्वात जवळ होते आणि पाकिस्तानी सैनिकांनी या क्षेत्रातील उंचीचा फायदा घेत या भागातील चौक्यांवर ताबा मिळवला होता.
पाकिस्तानने कश्मिर खोरे, किश्तवाड-भद्रवाह आणि हिमाचलप्रदेशातील शेजारी भागांमध्ये घुसखोरी करण्याच्या उद्देष्याने मस्कोह चौकीवर ताबा प्रस्थापित केला होता. तर, बटालिक-यलदोर क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने सिंधु नदीच्या उंचावरील भूभागांमध्ये ताबा मिळवला होता ज्यामुळे लेह या क्षेत्रापासून अलग पडेल.
चोरबतला आणि तुर्तुक या क्षेत्रात यासाठी पाकिस्तानने कब्जा केला ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्रावर कब्जा केला जाऊ शकेल आणि येथील लोकांना दहशतवादाकडे ओढता येईल. या महत्वपूर्ण चौक्यांवर ताबा मिळवल्यानंतर मश्कोह-काकसर क्षेत्रांमध्ये केलेल्या घुसखोरीला अंतिम स्वरूप देण्यात येणार होते आणि त्यामुळे श्रीनगर-लेहला जोडणारा राजमार्ग बंद करता आला असता.