महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कसा असेल तुमचा आजचा दिवस.. जाणून घ्या आपले राशी भविष्य

आपल्या राशीत आज काय लिहिलय, घ्या जाणून...

horoscope
राशी भविष्य

By

Published : Jan 31, 2020, 7:44 AM IST

मेष -आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. आर्थिक देवाण - घेवाण करताना सावध राहावे. गूढ विषयांकडे कल होईल. लोभाच्या लालसे पासून दूर राहा. निर्णयशक्तीच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.

वृषभ -आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आजचा संपूर्ण दिवस उल्हास व प्रसन्नतेने भरलेला असेल.

मिथुन -शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामे सुद्धा सहजतेने पूर्ण होतील.

कर्क -आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.व्यापार - व्यवसायात फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशगमन व मंगल कार्य ह्यात सफलता मिळेल.

सिंह -आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. अवैध कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

कन्या -आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.

तूळ -आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर व मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान - सन्मान मिळेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

वृश्चिक -आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

धनू -आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गा कडून हानी संभवते. नदी, तलाव, समुद्र अशा जलाशयांपासून सांभाळून राहा.

मकर -आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. मित्र व आप्त यांच्या भेटीने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ -आज आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळे विपरीत परिणाम होईल.प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद - विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च व धनहानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील.

मीन -आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते. एखाद्या प्रवासात किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल.

ABOUT THE AUTHOR

...view details