मेष -आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करेल. पण ते विचार मनातून काढून टाकावेत. पैसा खूप खर्च होईल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
वृषभ -आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.
मिथुन -आज आपल्या उक्ती व कृतीमुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. कुटुंबीयांशी वाद होतील. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल. मन:शांतीसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कर्क -आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.
सिंह -आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खुश होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या -आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संततीविषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया वाढतील.