मेष -आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्याकडून फायदा होईल. मित्र, स्नेही व सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ -आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल. एखादा अपघात संभवतो. खूप परिश्रम करून सुद्धा आज अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही.
मिथुन -आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी - व्यवसायात प्राप्ती वाढेल.
कर्क -आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकार कडून ही फायदा संभवतो.
सिंह -आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
कन्या -सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती - पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.
तूळ -घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता - पिता ह्यांच्या कडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
वृश्चिक -आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारसदृश बाबींपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत.
धनू -आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. तार्किक व बौद्धिक चर्चे पासून शक्यतो दूर राहा.
मकर -आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. मनःस्ताप व प्रतिकूल वातावरणामुळे दिवस कटकटीचा जाईल.
कुंभ -मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
मीन -आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.