मेष -आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळे द्विधा अवस्थेत अडकाल.आज कोणाला जामीन राहू नये.
वृषभ -आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे व वडीलधार्यां कडून लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मिथुन -आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आज सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन आपला मार्ग मोकळा होईल.
कर्क -आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह -आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावेत.
कन्या -आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.