मेष -आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपारनंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल. नव्या ओळखी विचारपूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा.
वृषभ -आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपार नंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.
मिथुन -आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.
कर्क -आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे.
सिंह -आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्य नरम गरम राहील. कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उदभवेल.
कन्या -आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.