मेष -आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणे उचित ठरेल.
वृषभ -आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन -आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते.
कर्क -आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने सुद्धा मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक मानहानी संभवते. निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
सिंह -कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.