महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कसा असेल तुमचा आजचा दिवस.. जाणून घ्या आपले राशी भविष्य - दैनंदिन राशी भविष्य

आजचे आपले राशी भविष्य वाचा..त्याप्रमाणे वागा आणि निर्धास्त राहा..

todays horoscope
todays horoscope

By

Published : Jan 14, 2020, 7:31 AM IST

Updated : Jan 14, 2020, 7:44 AM IST

मेष -आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्या शिवाय पाऊल उचलणे हानिकारक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ -आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखविण्यास अनुकूलता लाभेल. आज शक्यतो संपत्ती विषयक कायदेशीर दस्तऐवज करू नये.

मिथुन -आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क -आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबीयांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल.

सिंह -आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलद गतीने होतील,

कन्या -आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरी पासून दूर राहणे हितकर होईल.

तूळ -आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. प्राप्तीत वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळतील.

वृश्चिक -आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहिल. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र - स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.

धनू -आज आपणाला प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी - व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. कामात फार कमी प्रमाणात यश मिळेल. उच्च अधिकारी व विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नये.

मकर -आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. आहारावर विशष लक्ष न दिल्यास प्रकृती बिघडेल. व्यवस्थापन कार्यात आपले नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ -आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्नलिंगी व्यक्तीशी परिचय होऊन त्याचे परिवर्तन प्रणयात होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन -मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख - शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल.

Last Updated : Jan 14, 2020, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details