महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' राशीच्या लोकांनी आज आपल्या वाणीवर ठेवावा संयम, अन्यथा... - 13-february

जाणून घ्या आजचे आपले अचूक राशी भविष्य..

horoscope
राशी भविष्य

By

Published : Feb 13, 2020, 7:34 AM IST

मेष -आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र-स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल.

वृषभ -आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत झाल्याने आपलाच फायदा होईल, तसेच मधुर व सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन-लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल.

मिथुन -आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.

कर्क -ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.

सिंह -आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. मानसिक दृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य यशस्वी होईल.

कन्या -आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.

तूळ -आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबीयांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

वृश्चिक -आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. तसेच रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.

धनू -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबीक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.

मकर -आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संततीविषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.

कुंभ -आज अवैध कृत्यांपासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील.

मीन -आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या-फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक व मानसिक दृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. आपली प्रतिष्ठा वाढेल.

ABOUT THE AUTHOR

...view details