महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 12, 2020, 7:51 AM IST

ETV Bharat / bharat

राशीभविष्य ..पाहा कसा जाईल तुमचा आजचा दिवस...

आजचे आपले राशीभविष्य वाचा..

दैंनंदिन राशीभविष्य
दैंनंदिन राशीभविष्य

मेष -आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावे लागेल.

वृषभ -आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबीयांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

मिथुन -आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क - आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

सिंह -आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद - विवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या.

कन्या -आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख - शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील.

तूळ -आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.

वृश्चिक - आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्‍या नातलगां कडून आनंददायी बातम्या मिळतील. संततीविषयक चिंता राहील.

धनू -आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.

मकर -आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.

कुंभ -आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. नोकराकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

मीन -आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर - सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details