महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दैनंदिन राशीभविष्य.. जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस..

काय लिहलयं आज तुमच्या राशीत घ्या जाणून...

horoscope
राशीभविष्य

By

Published : Feb 11, 2020, 7:48 AM IST

मेष -आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती व नियोजन ह्यापासून दूर राहावे. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ -आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन -आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल.

कर्क -आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैध बाबीं पासून दूर राहावे. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह -आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे - वागणे संयमित ठेवावे लागेल. रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कन्या -दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत हाताखाली काम करणार्यां पासून सावध राहावे.

तूळ -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. भिन्नलिंगी मित्रांशी झालेली भेट आनंददायी ठरेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.

वृश्चिक -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संततीची प्रगती झाल्याने आपले समाधान होईल.

धनू -आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी दोन हात करावे लागतील.

मकर -आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.

कुंभ -आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारां कडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल.

मीन -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरून एखादी चांगली बातमी मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details