महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीत उभारले जगातील सर्वात मोठे 'कोविड केअर सेंटर'... - उपराज्यपाल अनिल बैजल

राधा स्वामी सत्संग केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. 1700 × 700 चौरस फूटाचे येथे मोठे प्रांगण आहे. येथे सत्संग भरवले जायते मात्र आता हे जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर म्हणून ओळखले जात आहे.

know-about-the-world-largest-covid-care-center-build-in-delhi
दिल्लीत उभारले जगातील सर्वात मोठे 'कोविड केअर सेंटर'...

By

Published : Jul 9, 2020, 2:08 PM IST

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील भाटी माइन्स छत्तरपूर येथे राधा स्वामी सत्संग केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. 1700×700 चौरस फूटाचे येथे मोठे प्रांगण आहे. येथे सत्संग भरवले जायते मात्र आता हे जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर म्हणून ओळखले जात आहे. हे संपूर्ण अंगण आता सरदार पटेल कोविड केअर सेंटरमध्ये 10 हजार खाटांसह बदलण्यात आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर याठीकाणी उपचार केले जात आहेत.

दिल्लीत उभारले जगातील सर्वात मोठे 'कोविड केअर सेंटर'...

5 जुलै रोजी हे सत्संग केंद्र कोविड केअर सेंटर म्हणून घोषित केले. त्यावेळी याठिकाणी 2 हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते. सध्या येथे जवळजवळ 200 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना रुग्णाचा वाढता कहर पाहता दक्षिण दिल्लीत तात्पुरते कोविड केअर सेंटर उभारण्याचे सरकारने ठरविले. त्यासाठी राधा स्वामी सत्संग केंद्राचे ठिकाण सर्वात योग्य होते. स्थानिक डीएम बीए मिश्रा यांनी पुढाकार घेऊन यासाठी कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला. 14 जूनपासून या सत्संग केंद्रात कोविड केअर सेंटर अधिकृतपणे उभारण्याची तयारी सुरू झाली. त्यानंतरही लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी येथे सर्वप्रथम भेट दिली आणि त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर डीएम बी. ए. मिश्रा यांच्या नेतृत्वात येथे काम सुरू झाले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे 18 जून रोजी येथे पाहणीसाठी गेले होते. 23 जून रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून या कोविड केअर सेंटरची पाहणी करण्याचे निमंत्रण दिले. तसेच याठिकाणी आयटीबीपीच्या सेवा कार्यान्वित करण्याची मागणीही केली.

गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी या कोविड सेंटरची पाहणी केली. तत्कालीन आयटीबीपीचे डीजी यांनी येथील वैद्यकीय सुविधांची माहिती गृहमंत्र्यांना दिली. येथे 50-50 बेडचे 200 ब्लॉक तयार केले गेले आहेत. 5 जुलै रोजी त्याचे उद्घाटन करताना लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी दिल्लीच्या कोरोना लढाईतील हे एक महत्वाचे केंद्र असेल असे सांगितले होते.

या कोविड केअर सेंटरमध्ये विना लक्षण आणि सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. ऑक्सिजनही सुविधा याठिकाणी आहे. परंतु, जर एखादा रुग्णांची हालत अचानक बिघडल्यावर त्याला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात पाठविले जाते. त्यासाठी रुग्णवाहिकांची पुरेशी व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. हे सेंटर सरदार पटेल कोविड केअर सेंटर दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलशी संलग्न आहे.

हेही वाचा-तिबेट मुद्द्यावरून चीनने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लादले

ABOUT THE AUTHOR

...view details